काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख: राजन तेलींना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा; जनतेला केला आवाहन..
⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये गेली 15 वर्ष आमदार असूनही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथील मूलभूत समस्या सोडवल्या नाही या ठिकाणी आजही अनेक प्रश्न जनतेला भेडसावत असून त्याकडे त्यांचा लक्ष नाही आरोग्य शैक्षणिक आणि रोजगाराचा प्रश्न भयानक आहे.त्यामुळे या ठिकाणी आता बदल घडवणे आवश्यक आहे म्हणून महाविकास आघाडीचा आमचे उमेदवार राजन तेली यांना जनतेने आमदार म्हणून विधानसभेत पाठवावा.असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी आज येथे केले
ते पुढे म्हणाले शिक्षण मंत्री असूनही ते शिक्षकांची रिक्त पदे भरू शकले नाहीत वेळ रोजगार उपोषण आंदोलन करत आहेत आरोग्याच्या बाबतीत आंबोली सारख्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लाईट नसल्याने बॅटरीच्या उजेडात प्रसूती करावी लागली हे सत्य आहे आपण हजारे कोटी चा निधी या ठिकाणी आणले असे केसरकर म्हणतात परंतु तो निधी गेला कुठे हा प्रश्न तितकाच आहे विकास ही निरंतर प्रक्रिया आहे काँग्रेसच्या काळात आत्ताची असणारी प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आली परंतु त्यांना पुढे नेण्याचे विकसित करण्याचे काम इथल्या लोकप्रतिनिधींनी केले नाही त्यामुळे या ठिकाणी आता बदल घडवणे आवश्यक असल्याचं इर्शाद शेख यांनी यावेळी स्पष्ट केले.
