जयेंद्र परुळेकर: कागदावरच्या घोषणा नको;बेरोजगार महागाईवर बोला…
⚡सावंतवाडी ता.०९-: निवडणुका जवळ आल्या की केसरकर रेटून खोटं बोलून विकास कामांचा पाडा वाचायला सुरुवात करतात. त्यामुळे त्यांना आता खरंच एखादा पुरस्कार द्यायला हवा असा टोला ठाकरे सेनेचे प्रवक्ते देवेंद्र परुळेकर यांनी लगावला. दरम्यान आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न भयानक असताना मात्र केसरकर त्यावर बोलायला तयार नाहीत. मात्र निवडणुका आल्या की मोठमोठ्या घोषणा करण्याचं काम केसरकर यांनी केलं आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.
