मंत्री दीपक केसरकर ७० हजार मताधिक्याने निवडून येणार…

संजू परब: विशाल परब जे विकासाचे व्हिजन दाखवतात त्यांचे टेंडर आधीच काढलेत, त्यामुळे जनतेने भुलभुलय्या पासून सावध रहावे..

⚡सावंतवाडी ता०८-: कोणी कितीही ताकद लावली तरी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर हे 70 हजार मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी आज आयोजीत पत्रकार परिषद व्यक्त केला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, विशाल परब जे विकासाचे व्हिजन दाखवत आहेत, त्याचे टेंडर दीपक केसरकर यांनी आधीच मंजुर केले आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल करणाऱ्या पासून सावध राहावे असे आवाहन संजू परब यांनी जनतेला केले आहे. येत्या 13 तारीख पासून, आपण राजन तेली व विशाल परब यांची दररोज पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार असल्याचा इशारा देखील संजू परब यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page