भर दिवसा एका वृध व्यक्तीला पोलीस असल्याची बतावणी करून लुटले….

सावंतवाडी शहरात एकच खळबळ: अज्ञात दोघा चोरट्या विरोधात गुन्हा दाखल..

⚡सावंतवाडी ता.०८-:
सावंतवाडी खासकिलवाडा येथील एका मेडिकल समोरील रस्त्यावर भर दिवसा एका वृध व्यक्तीला पोलीस असल्याची बतावणी करून लुटले. यात साठ हजार रुपयांचे सोन्याची चेन व अंगठी घेऊन अज्ञात चोरट्यांनी पलायन केले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चोरट्यांचा शोध घेतला मात्र चोरटे सापडले नाही. याप्रकरणी अज्ञात दोघा चोरट्यावर फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सरमळे येथील विठ्ठल देसाई हे सावंतवाडी येथे मुलीकडे आले होते. ते गुरुवारी डॉक्टर कडे चेक अप ला गेले तिथून औषध घेण्यासाठी एका मेडिकल मध्ये खासकिलवाडा येथे गेले होते. घरी परतत असताना अज्ञात दोघा संशयित यांनी शहरात पुढे वातावरण बिघडले आहे तुमचे सोन्याचे दागिने काढून कागदात ठेवा आम्ही पोलीस आहोत असे सांगून फिर्यादी यांचे कडील गळ्यातील सोन्याची चेन व अंगठी घेतली ती कागदात ठेवत फिर्यादी यांना फक्त खाली कागदाची पुडी देत दुचाकी वरून पलायन केले. त्यानी कागद उघडून पहिला असता त्यात सोन्याची चेन व अंगठी नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी देसाई यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. घटनाथस्ळी पोलीस दाखल झालेम मात्र चोरटे सापडले नाही. सिसिटीव्ही वरुन चोरट्यांचा शोध सुरु आहे.

You cannot copy content of this page