…अन्यथा कारवाई अटळ

दीपक केसरकर यांची माहिती: समन्वयक बैठकीमुळे माझा विजय निश्चित..

⚡सावंतवाडी ता.०७-: महायुतीचे काही कार्यकर्ते इतर उमेदवारांसोबत काम करत असल्याचे आजच्या सरपंच व पदाधिकारी बैठकीत समोर आले आहे. त्यामुळे यापुढे तसे कोण आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीची समन्वयक बैठक सावंतवाडीत पार पडली यावेळी श्री. केसरकर बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बैठकीत विविध विषयांवर मार्गदर्शन करून निवडणुकी संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत महायुतीचा विजय व्हायला पाहिजे यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करा असे आदेश सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना असे आदेश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्याचे केसरकर यांनी सांगितले.

You cannot copy content of this page