मळगाव येथील ७३ वर्षीय वृद्ध बेपत्ता…!

सावंतवाडी ता.०३- : मळगाव कुंभार्ली (वेत्ये मार्गानजीक) येथील ७३ वर्षीय वृद्ध आज सकाळपासून घरातून बेपत्ता झाले असून त्यांचा मोठ्या प्रमाणात शोध सुरु आहे. मोहन सोनुर्लेकर असे त्यांचे नाव असून त्यांचे पुतणे मिलिंद सोनुर्लेकर हे त्यांना सकाळी चहा घेऊन गेले असता ते घरात आढळून आले नाहीत.

दरम्यान त्यांचा शोध सुरु आहे. संबंधित व्यक्ती कोणाला आढळून आल्यास प्रसाद सोनुर्लेकर-९४२०५०५०७२/९८५०८७४९८० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बेपत्ताची पोलीस ठाण्यात अद्याप नोंद करण्यात आली नाही.

You cannot copy content of this page