घरासमोरील बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लावू शकले नाहीत ते बाकीचा विकास काय करणार…?

निशांत तोरसकर: आमदारांनी निधी खर्च करण्यास कानाडोळा केल्याचा ही केला आरोप…

⚡सावंतवाडी ता.०३-: गेल्या पंधरा वर्षाच्या आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात विद्यमान आमदारांना आपल्या निवासस्थानासमोर असणाऱ्या अखेरच्या घटका मोजणाऱ्या बसस्थानकाचे प्रश्न मार्गी लावू शकले नाही. ते बाकीचा विकास काय करणार असा टोला लगावत, आता विकासासाठी आमदार बदलण्याची गरज असल्याचे युवा सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांनी आवाहन केले आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, शासन स्तरावरून एस्टी बसस्थानक दुरुस्त करण्यासाठी भरीव निधी दिला जात आहे. परंतु, सावंतवाडीच्या विद्यमान आमदारांनी हा निधी खर्च करण्यात कानाडोळा केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केसरकर यांच्यावर केला आहे.

You cannot copy content of this page