⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपला आणखी एक धक्का बसला असून, राजन तेली यांच्या पाठोपाठ त्यांचे सुपुत्र प्रथमेश तेली यांनी आज भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष पदाचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे सोपवला आहे. यावेळी त्यांनी आपल्यावर काही नेते अन्याय करत असून, आपल्या कामात अडथळा निर्माण करत असल्याने राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रथमेश तेली यांचा भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा…!
