कणकवली विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांनी घेतली त्या शेतकरी कुटुंबाची भेट…!

⚡कणकवली ता.०३-: विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी फोंडा झर्येवाडी येथे वीज कोसळून महादेव बाणे यांच्या मालकीची चार जनावरे दगावली. या जनावरांमध्ये १ गाभण गाय व ३ बैल यांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे श्री. बाणे कुटुंबियांच्या हातातोंडाचा घास हिरावला गेला आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांनी घटनास्थळी घटनास्थळी भेट देऊन बाणे यांना प्रशासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

सदर घटनेक्सह प्रशासकीय स्तरावर पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान या दुर्घटनेमुळे महादेव बाणे यांचे मोठे नुकसान झाले आहे. बदलत्या निसर्ग चक्रामुळे परतीचा पाऊस काही कमी होत नाही. हा पाऊस केव्हाही, अवेळी पडत असल्यामुळे भातकापणीची कामे रेंगाळली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच जनावरे दगावल्यामुळे या शेतकरी कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

You cannot copy content of this page