मळेवाड जकातनाका येथे युवा मित्र मंडळा तर्फे नरकासुर स्पर्धेच आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२८-: मळेवाड जकातनाका येथे युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडूरे कडून 30 ऑक्टोंबर 2024 रोजी रात्री 08:30 वाजता निमंत्रित नरकासुर स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये मळेवाड कोंडूरे गावासह सातार्डा, कवठणी, आजगावं, दांडेली, न्हावेली या गावातून निमंत्रित केलेले मंडळांचे नरकासुर सहभागी होणार आहेत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाने केलें आहे.

You cannot copy content of this page