राजन तेली: कोणीही येऊन कोणाला धमक्या दिल्या तरी आमदार मीच होणार…
⚡सावंतवाडी ता.२८-: दीपक केसरकर यांनी विकासाच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत ज्यांच्यावर अन्याय केला त्यांनी मला साथ द्यावी असे आवाहन महायुतीचे उमेदवार राजन तेली यांनी सावंतवाडी आयोजीत पत्रकार परिषदेत केले आहे.
दरम्यान शिवसेनेने तुम्हाला भरपूर दिले असताना देखील तुम्ही गदारी केली, असा कोणता अन्याय तुमच्यावर शिवसेनेने केला..? असा सवाल देखील त्यांनी यावेळी दीपक केसरकर यांना विचारला आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, खासदार नारायण राणे यांनी सावंतवाडीत येऊन केलेले वक्तव्य भयानक असून, ते कुठले हुकूमशहा आहेत का? असा सवाल देखील उपस्थित केला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले, राणे ना माझा व्यवसाय माहित नसेल तर माझी आयटी रिटर्न फाईल मी त्यांना पाठवतो त्यावरून त्यांना माझा व्यवसाय समजेल असे स्पष्ट करत राणेंच्या आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे. मी अजून पर्यंत कोणतेही खोटे काम केले नाही. मी कुठे चुकलो असेल तर माझे कान धरा परंतु, माझा परिवारावर जाऊ नका असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. या निवडणुकीत मतदारांना कितीही धमक्या दिल्या, पैसे , साड्या वाटल्या तरी देखील एक नंबरचा मताधिक्याने माझा विजय होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
