उमेदवारी अर्ज दाखल करतानाउमेदवारासह पाच माणसच उपस्थित राहू शकतात…

प्रांताधिकारी हेमंत निकम:उमेदवारांनी प्रचारासाठी आवश्यक असलेल्या जागेसाठी 48 तास आधी अर्ज करून परवानगी घेणे गरजेचे…

सावंतवाडी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे सकाळी 11 ते सायंकाळी तीन वाजेपर्यंत ही मुदत असून उमेदवारासह पाच माणसे यावेळी उपस्थित राहू शकतात अशी माहीती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सावंतवाडी प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली.

तर निवडणूक कालावधीमध्ये अवैद्य गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण नऊ स्थिर सर्वेक्षण पथके तर सहा भरारी पथके तैनात करण्यात आली असून एकूण 1800 कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आले आहे असेही ते म्हणाले.
श्री निकम यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली

यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते. ते म्हणाले उद्या 22 ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे 29 तारीख पर्यंत इच्छुक उमेदवार सुट्टीचा दिवस वगळून उमेदवारी दाखल करू शकतो सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे तर 30 तारीख रोजी अर्ज सामने होणार असून चार नोव्हेंबरला अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख राहणार आहे. उमेदवार हा त्यासोबत अजून चार माणसे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणू शकतो उमेदवारी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सुविधा एप्लीकेशन वर दाखल करून नंतर ऑफलाइन पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करायचा आहे. अर्ज दाखल करण्यासाठी येताना उमेदवाराने आपली वाहन 100 मीटर लांब ठेवणे गरजेचे आहे.

ते पुढे म्हणाले चूक उमेदवारांनी प्रचारासाठी आवश्यक असलेल्या जागेसाठी 48 तास आधी अर्ज करून परवानगी घेणे गरजेचे आहे एका जागेसाठी इच्छुक उमेदवारांकडून अडचण होऊ नये अशा पद्धतीने त्यांनी जागेची परवानगी घेणे गरजेचे आहे ही परवानगी मिळण्यासाठी एक प्रांत कार्यालयाच्या ठिकाणी एक खिडकी योजना करण्यात आली आहे. तसेच मतदारांना मतदान केंद्रावर सुविधा देण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात येणार आहे. आचारसंहिता लक्षात घेता विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातून तब्बल 862 पोस्टर काढण्यात आली आहेत तर अवैद्य गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण सहा भरावे पदके तर नऊ स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहे यामध्ये प्रत्येक विभागातील कर्मचारी नेमणूक करण्यात आले आहेत. भरारी पथके ही प्रत्येक तालुक्यात दोन तैनात असणार असून स्थिर सर्वेक्षण पथकांमध्ये सावंतवाडी मध्ये पाच वेगुर्ले मध्ये एक तर दोडामार्ग मध्ये दोन पथके असणार आहेत. अनु कलावधीमध्ये जिल्ह्याच्या सेमी बाहेरून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी याद्वारे करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page