संजू परब: राणें मुळेच राजन तेली माजी आमदार म्हणून मिरवतात..
⚡सावंतवाडी ता.१९-: राजन तेली यांनी काल ठाकरे सेनेत प्रवेश केल्यामुळे भाजपला कोणताही फरक पडलेला नाही,असा टोला भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी आज इथ लगावला. दरम्यान राजन तेली जे आज माजी आमदार म्हणून मिरवतात हे फक्त राणे कुटुंबियांमुळेच, त्यामुळे यापुढे राणेंवर पुन्हा बोललात तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा श्री परब यांनी यावेळी दिला. ते सावंतवाडीत आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्प्रहणाले प्रवेश करताना राजन तेली यांच्यासह एकही भाजपचा पदाधिकारी, कार्यकर्ते गेला नाही. यावरून त्यांनी विधानसभा प्रमुख म्हणून काय काम केले ते समजले असेल. त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत गेलाय की नाही याची कल्पना नाही. त्याबाबत माहिती घेऊन सांगेन. माझा आमदारकीसाठी दावा कायम आहे. पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी माझी भुमिका मांडेन असे मत संजू परब यांनी व्यक्त केले.
