दोडामार्ग ता१५-: दोडामार्ग धाटवाडी येथे भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या गोशाळेचे विशाल परब आणि सौ वेदिका परब यांच्या हस्ते विधिवत गोपुजन करून उद्घाटन करण्यात आले.
रस्त्यांवर भटकणाऱ्या आणि वाहन अपघात बळी पडणाऱ्या गुरांचे रक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी विशाल परब यांनी पुढाकार घेऊन ही गोशाळा उभारली आहे. आपल्या वाढदिवसादिवशी या गोशाळेचे उद्घाटन करून त्यांनी समाजासमोर वेगळे उदाहरण माडले आहे. त्यांच्या या कार्यामुळे हिंदू समाजातील विविध संघटनांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
