कुडाळमध्ये अपघात, पादचाऱ्याचा मृत्यु…

कुडाळ, प्रतिनिधी

कुडाळ शहरातील पंचायत समितीसमोर आज संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास दुचाकीने पादचाऱ्यास दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली. प्रकाश मेस्त्री (रा. भैरववाडी, कुडाळ, मूळ गाव: आसोली, ता. वेंगुर्ले) असे मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, चिन्मय दयानंद पाटकर (वय २२, रा. पिंगुळी काळेपाणी) हा दुचाकीस्वार कुडाळ एसटी नवीन स्टँडकडून येताना पंचायत समितीसमोर दुचाकीची धडक बसली. या धडकेत पादचारी मेस्त्री यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र, प्रकाश मेस्त्री यांना तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला.

You cannot copy content of this page