भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर…

दोन मोठ्या नेत्यांनी एकाच दिवशी बोलवल्या दोन वेगवेगळ्या बैठका; फुटीचा फायदा मंत्री केसरकर यांना होणार की महाविकास आघाडीला …?

सावंतवाडी ता.१४-:सावंतवाडीत एकाच दिवशी भाजपच्या दोन वेगवेगळ्या बैठका होत असून, माजी आमदार राजन तेली यांनी बैठक बोलावली होती तर महेश सारंग यांनी देखील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. एकाच मतदार संघात दोन वेगवेगळ्या बैठका होत असल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले असून, भाजप मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघ भाजप ला मिळावा अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.

तर भाजप मधून अनेक इच्छुक उमेदवार जोरदार तयारी देखील करत आहे. यात एकाच मतदार संघात एकाच वेळी भाजप मधील दोन मोठ्या नेत्यांनी बोलविलेल्या वेगवेगळ्या बैठका भाजप मधील धुस्पुस बाहेर आणत आहेत. मात्र या दोन्ही बैठकांकडे विशाल परब समर्थकांनी पाठ फिरवली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप मध्ये पडलेल्या ह्या फुटीचा फायदा मंत्री दीपक केसरकर यांना होणारं की महाविकास आघाडी याचा फायदा उचलणार हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.

You cannot copy content of this page