एकीकडे विकास कामांचा धडाका अन् विकास कामांच्या भूमिपूजनास शिंदे शिवसेना व भाजप मध्ये रंगला श्रेयवाद…

राजन तेलींच्या माध्यमातून काम मंजूर झाल्याच आनंद नेंवगींचा दावा:तर शिंदेसेना व भाजपचा विजय असो अशा घोषणा देत अनारोजन लोबोंने प्रकरण केले थंड..

सावंतवाडी : आमदार तथा मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहरात मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचे आज भूमिपूजन होत आहे. असे असताना वैशवाडा येथील भूमिपूजनास शिंदे शिवसेना व भाजप च्या पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेयवाद रंगला असल्याचे पहायला मिळते आहे. भाजपचे माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी चक्क भूमिपूजनला माजी आ. राजन तेली यांनी काम मंजूर केल्याचे पत्र दाखवले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण बनले होते.

मात्र यावेळी शिवसेनेच्या ज्येष्ठ माजी नगराध्यक्ष अनरोजीन लोबो यांनी मात्र शिंदे – भाजप सेनेचा विजय असो अशा घोषणा देत तापलेले प्रकरण थंड केले.

यावेळी आनंद नेवगी यांनी सदरची विकास कामे ही राजन तेली यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्याचा दावा केला. त्यामुळे शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना श्रेय देऊ नये असा टोला ही त्यांनी यावेळी हाणला.

You cannot copy content of this page