चौकुळ मधील भास्कर ज्वेलर्स प्रस्तुत बुद्धिबळ स्पर्धेत आर्यन गावडे प्रथम…

आंबोली,ता.१३: चौकुळ शाळा नं.१ : शारदोत्सव २०२४ निमित्त गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी जि. प.केंद्र प्राथमिक शाळा चौकुळ नं.०१ शाळेमध्ये भास्कर ज्वेलर्स प्रस्तुत बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आली . सदर स्पर्धेमध्ये चौकुळ केंद्रातील शाळांनी आपला सहभाग नोंदवला. श्री .उल्हास पनवेलकर यांच्या विचारातून ही स्पर्धाघेण्यात आली .श्री.पनवेलकर यांनी विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून शाळेतील विद्यार्थ्यासाठी बुद्धिबळ संच शाळेतील विद्यार्थ्यासाठी दिले आहे . त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली .सर्व विजेते स्पर्धकांना श्री.उल्हास पनवेलकर यांच्याकडून बक्षीस वितरण करण्यात येणार आहे
सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आर्यन गावडे शाळा चौकुळ नं.१ इयत्ता २ री-२ मिनिट सेकंद.३६ सेकंद . द्वितीय क्रमांक कार्तिक पांडुरंग गावडे शाळा चौकुळ नं.१ इयत्ता ५ वी – २ मिनिट ५० सेकंद
तृतीय क्रमांक भावेश सावळाराम चव्हाण शाळा चौकुळ नं.१ इयत्ता ७ वी – ९ ४० मिनिट.४० सेकंद.
सर्व सहभागी आणि विजेते स्पर्धकांचे अभिनंदन मा.श्री उल्हास पनवेलकर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीम.शीतल प्रशांत गावडे यांनी केले.

You cannot copy content of this page