मालवण दौर्यातील गाठीभेटी परीणामकारक ठरल्या…

श्रीकांत सावंत:मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचा मालवण दौरा…

⚡मालवण ता.१२- : मानवता विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचा ११ ऑक्टोबरला मालवण दौरा संपन्न झाला. या दौर्यामध्ये त्यांनी मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, मालवण पोलिस निरीक्षक तथा प्रभारी प्रवीण कोल्हे यांची भेट घेतली आणि कोकणविषयी विविध शासकीय व प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा केली. श्रीकांत सावंत यांच्यासह मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे सोशल मिडिया प्रमुख सुयोग पंडित उपस्थित होते.

या भेटीदरम्यान श्रीकांत सावंत यांनी कृ सी देसाई शिक्षण मंडळ मालवण यांच्या स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाला भेट देऊन प्राचार्य प्रा. डाॅ. शिवराम ठाकुर यांच्याशी स्थानिक विद्यार्थी विद्यार्थिनींना ‘आपला गांव’ कसा सक्षम होईल याबाबत मार्गदर्शनपर उपक्रमांच्या आखणीची चर्चा केली. याबाबत यापूर्वी २०१९ साली मानवता विकास परीषदेने स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सहयोगाने जो उपक्रम संपन्न केला त्याचा पुढील टप्पा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेच्या माध्यमातून साकार करता येण्याविषयी प्राचार्य शिवराम ठाकुर यांनी सकारात्मकता दर्शवली. वैद्यकीय शिक्षण मातृभाषेतून घेण्याविषयी मानवता विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी प्राचार्य डाॅ शिवराम ठाकुर यांच्याशी विचार विनिमय केला.

या दौर्यात श्रीकांत सावंत यांनी
मालणच्या चिवला बिच येथील पारंपरिक रापणसंघांचे मालक गुरु ताम्हणकर, विजय फाटक, अंतोन कैतान मेंडिस, दाजी जोगी, महेश हडकर व सदस्यांची थेट किनारपट्टीवरुन जाऊन भेट घेत त्यांचे विविध मुद्दे जाणून घेतले. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद ही कोकणातील मच्छिमारांच्या संघटीत यशासाठी प्रयत्नशील राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. रिक्षा संघटनेचे सदस्य तथा समाजसेवक भिवा शिरोडकर यांच्या भेटीत भिवा शिरोडकर यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेला सहकार्य करायची ग्वाही दिली.

यादरम्यान श्रीकांत सावंत यांनी
मालवणचे माजी बांधकाम सभापती तथा जिल्हा नेते मंदार व उद्योजक व समाजसेवक श्री राजा शंकरदास यांचीही सदिच्छा भेट घेतली.

हा मालवण दौरा अत्यंत आनंददायी ठरला असून भेट घेतलेल्या शासकीय, प्रशासकीय, औद्योगिक, शैक्षणिक व श्रमिक घटकांनी मानवता विकास परीषदेच्या विविध भूमिकांना दिलेला प्रतिसाद महत्वाचा असल्याचे श्रीकांत सावंत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page