मालवण (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यात आरोग्य सेवा देणे एवढाच उद्देश न ठेवता, आपण समाजाचे काही देणे लागतो, या उद्देशाने आरोग्य सेवेसोबतच सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण यातही योगदान द्यावे, या उदेशाने मालवण तालुक्यातील डॉक्टरांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या रॉयल मालवणी संस्थेच्या अध्यक्ष पदी डॉ. अभय परब, तर उपाध्यक्ष पदी डॉ. सिद्धू सकपाळ यांची एकमताने निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणी अशी सचिव डॉ. अमोल हुले, खंजिनदार डॉ. स्वप्नील भोगटे, सल्लागार डॉ. नसीर पटवेलकर, डॉ. राहुल वझे, कार्यकारिणी सदस्य-डॉ. सुनील साळुंखे, डॉ. राहुल चिंदरकर, डॉ. रोहित डगरे, डॉ. प्रथमेश वालावलकर, डॉ. हर्षद पवार, डॉ. धनंजय सावंत, डॉ. धनंजय आचरेकर. यासाठी डॉ. विवेक रेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
मालवण तालुक्यात आरोग्य सेवा देता देता क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येऊन आमच्यात निर्माण झालेल्या जिवलग मैत्रीच्या नात्यातून सामाजिक कार्याची आवड असलेल्या आम्ही डॉक्टरांनी सेवाभावी संस्थेत याचे रुपांतर केले. याच वर्षी या ग्रुपने सिंधुदुर्ग डॉक्टर प्रीमिअर लीग क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील डॉक्टर यात सहभागी झाले होते. पुढेही वैद्यकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, पशुसंवर्धन, पर्यावरणपूरक अशी अनेक उद्दिष्ट्ये घेऊन संस्था काम करणार आहे. जिल्ह्यात नर्सिंग कॉलेज व्हावे. त्यातून आरोग्य सेवेला अजून उभारी मिळावी, हे व असे अनेक उपक्रम राबवावेत, असे स्वप्न संस्थेचे असल्याचे यावेळी अध्यक्ष डॉ. परब, उपाध्यक्ष डॉ. सकपाळ यांनी सांगितले.
