दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा सिंधुदुर्ग निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर…

मालवण दि प्रतिनिधी
धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमानिमित्त आयोजित दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा व महिला जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात जिल्हा परिषद शाळा कणकवलीची विद्यार्थिनी गाथा अमोल कांबळे हिने तर माध्यमिक गटात तनया प्रवीण कदम याने प्रथम क्रमांक पटकाविला या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा भवन कणकवली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार

दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा व महिला जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती या स्पर्धेमध्ये प्राथमिक गटामध्ये व माध्यमिक गटामध्ये एकूण 55 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता प्राथमिक गटासाठी परिवर्तनाचा महामेरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर माध्यमिक गटासाठी भारतीय संविधाना पुढील आव्हाने व उपाय हे दोन विषय देण्यात आलेले होते . प्राथमिक गट इयत्ता पाचवी ते आठवी असा ठेवण्यात आलेला होता या गटामध्ये प्रथम क्रमांक गाथा अमोल कांबळे सातवी जिल्हा परिषद शाळा कणकवली, द्वितीय क्रमांक नंदिनी विजय राणे इयत्ता सातवी विद्यामंदिर हायस्कूल कणकवली तृतीय क्रमांक मनस्वी वल्लव कदम सहावी जिल्हा परिषद शाळा
आडवली उत्तेजनार्थ कर्तुत्वा विनायक
हरकुळकर इयत्ता आठवी विद्यामंदिर हायस्कूल कणकवली तर माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक तनया प्रवीण कदम बारावी कणकवली कॉलेज कणकवली द्वितीय क्रमांक वैभवी सुरेश चिपकर नववी न्यू इंग्लिश स्कूल उभा दांडा तृतीय क्रमांक विभा अविनाश म्हसकर अकरावी कणकवली कॉलेज कणकवली उत्तेजनार्थ आर्य उदय तांबे दहावी माध्यमिक विद्यामंदिर कनेडी
या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा भवन कणकवली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे होणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून आपलं बक्षीस स्वीकारण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे

You cannot copy content of this page