Headlines

अलाईव्ह स्टॅचू ग्रुपला मुंबई येथे राज्य शासनाचा राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार प्रदान…

⚡बांदा ता.११-: विविध राज्यस्तरीय स्पर्धाच्या माध्यमातून जिवंत हुबेहूब पुतळे साकारणाऱ्या बांदा येथील अलाईव्ह स्टॅचू ग्रुपला मुंबई येथे राज्य शासनाचा राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.
या ग्रुपच्या कलाकारांनी जिवंत मानवी पुतळे साकारून ही एक वेगळी संकल्पना रसिकांसमोर सादर केली. राज्याच्या विविध भागात तसेच लगतच्या गोवा राज्यातही या कलेला रसिकांनी भरभरून दाद दिली. या कलेतून मिळणाऱ्या मानधनातूनही ग्रुपच्या कलाकारांनी सेवाभाव जोपासत शैक्षणिक व आरोग्य उपक्रमाला हातभार लावला. कित्येक निराधारांना आधार दिला. ग्रुपच्या कलेची व सामाजिक कार्याची दखल घेत शासनाने राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार देऊन गौरविले आहे.
यावेळी पुरस्कार समीती अध्यक्ष निलेश अनभवणे, निरीक्षण समिती सदस्य श्री रामनाथ कोळी क्राईम इन्वेस्टीगेशन एक्सप्रेसचे प्रतिनिधी अर्जुन गोरेगावकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कलाकारांना गौरविण्यात आले. यावेळी ग्रुपचे पदाधिकारी मनोज कल्याणकर, ऊर्विश पावसकर, विश्वास सावंत आदी उपस्थित होते. बांदा परिसरातून कलाकारांचे अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page