वाफोली येथे कॅन्टरचा अपघात…

मध्यरात्री एकची घटना: सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत नाही..

⚡बांदा ता.११-: बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथे भरधाव वेगात वळणाचा अंदाज न आल्याने कॅन्टर रस्त्यालगतच्या घळणीत जाऊन अपघातग्रस्त झाला. हा अपघात मध्यरात्री १ वाजण्याचा सुमारास झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. याठिकाणी मार्गदर्शक सूचना किंवा रिपलेक्टर नसल्याने वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यात याठिकाणी अनेक अपघात झाले आहेत.

You cannot copy content of this page