सिंधुरत्न योजनेच्या कामांची चौकशी करा…

बाबुराव धुरी ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

⚡सावंतवाडी ता.१०-: सिंधुरत्न योजनेच्या निधी ज्या ज्या कामांसाठी खर्च झालेला आहे. त्या सर्व निधीच्या वापराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उबाठा शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पञाद्वारे केली.

सिंधुरत्न योजनेच्या निधीतून करण्यात आलेली विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या कामांचीही चौकशी होणे आवश्यक आहे असेही त्यांनी पञात म्हटले आहे.
तसेच सिंधुरत्न योजनेच्या निधीचा वापर करताना मंजूर करण्यात आलेल्या कामांचे निकष तपासून पाहणे आवश्यक आहे. कारण काही निधी सर्वसामान्यांसाठी खर्च न होता, वैयक्तिक व व्यावसायिक लोकांसाठीच विद्युत ट्रान्सफॉर्मर मंजूर करुन व्यावसायिकांसोबतचे वैयक्तिक संबंध जपण्यासाठी सिंधुरत्न योजनेचा गैरवापर करण्यात आला असल्याचे निदर्शनास येत आहे.
या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी विनंती त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे केली.
यावेळी जिल्हाप्रमुख श्री.बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख श्री.रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख श्री.यशवंत परब, माजी जिल्हाप्रमुख श्री.रमेश गावकर , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page