राजन तेली: आमच्या सरपंचावर अविश्वास ठरावाची नोटीस पाठवत असेल तर आम्ही मित्रपक्षाच्या नेत्यांचे काम कसं करायचं..?*_
⚡सावंतवाडी ता.१०-: मंत्री दिपक केसरकर यांनी आजपर्यंत केलेल्या घोषणा मध्ये १० जणांना जरी नोकऱ्या लावल्या तर मी त्यांचा येणाऱ्या निवडणुकीत प्रचारप्रमुख बनेल असा टोला माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे लगावला.
दरम्यान भाजपच्या प्रभारी सरपंचावर एखादा मित्रपक्षाचा नेता दबाव टाकून अविश्वासाचा ठरावाची नोटीस पाठवत असेल तर आम्ही यांच काम कसे करायचे असा सवाल ही श्री.तेली यांनी यावेळी उपस्थित केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले, केसरकर यांनी माझे राजकीय पुनर्वसन करण्याची गरज नाही, माझी वरिष्ठ नेते माझ्याबद्दल विचार करतील. तुम्ही तुमच्या पार्टीचा व तुमच्या कार्यकर्त्यांचा विचार करा , असा पलटवारही तेली यांनी केला. दरम्यान केसरकर यांना निवडणुका आले की युती आठवते दोन वर्ष एकत्र काम करताना आमच्या एखादा आमच्या कार्यकर्त्याला काम दिलं तर केसरकर यांनी सांगावे असेही तेली यांनी यावेळी स्पष्ट केले.तर दरम्यान आंबोली कबुलायतदार प्रश्न हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामुळे सुटला असून त्यामुळे मी त्यांच मनापासून अभिनंदन करतो असे तेली यावेळी बोलताना म्हणाले.
