आजगाव येथील “त्या” स्पीडब्रेकर वर पांढरे पट्टे नसल्याने बनला धोकादायक…!

⚡सावंतवाडी ता.०७-: आजगाव येथील सेंट फ्रान्सिस झेवियर्स हायस्कूल जवळील स्पीडब्रेकर वरील पांढरे पट्टे धुसर झाल्याने तेथील स्पीडब्रेकर हा धोकादायक बनला आहे, या रोडवर महाविद्यालय, शाळेतील विद्यार्थी तसेचं वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, पुढे शिरोडा बाजारपेठेत जाणारा हा रोड असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गाड्यांची ये जा सुरू असते.
वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पीडब्रेकर बसविण्यात येतात, मात्र स्पीडब्रेकरवर रंगवण्यात येणारे पांढरे पट्टे कालांतराने धुसर होऊन ते पट्टे दिसेनासे होतात, त्यामुळे वाहनचालकांना वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण बनते त्यामुळे असे स्पीडब्रेकर अपघातास कारणीभूत ठरतात.

त्यामुळे येथील स्पीडब्रेकर वर लवकरात लवकर पांढरे पट्टे रंगवून त्यावर रिप्लेक्टर बसविण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

You cannot copy content of this page