शहरातील बंद असलेले प्रकल्प मनसे सुरू करणार…

राजू कासकर : केसरकरांच्या पराभवासाठी मनसैनिक पेटून उठून काम करणार..

⚡सावंतवाडी ता.०७-: शहरातील रखडलेले प्रश्न तसेच बंद असेलले प्रकल्प येत्या काही दिवसात मनसेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव-खालत ते प्रकल्प सुरू करून घेण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे शहर अध्यक्ष ॲड. राजू कासकर यांनी आज येथे दिली.

दरम्यान निवडणुका आल्या की मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या केसरकर यांनी बंद असलेले प्रकल्प मात्र त्यांना सुरू करण्यास जमत नाही, त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत केसरकर यांचा पराभव करण्यासाठी मनसैनिक पेटून उठून काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page