महेश सारंग:दोडामार्ग येथे भाजप कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न..
⚡ दोडामार्ग ता.०६-: पक्ष नेतृत्व जो उमेदवार देईल त्याला सर्वांनी एक मताने निवडून आणण्यासाठी कामाला लागा, पक्ष संघटना मजबूत करा, असे आव्हान भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी आज येथे केले. भारतीय जनता पार्टी दोडामार्ग यांची संघटनात्मक आढावा बैठक दोडामार्ग येथे संपन्न झाली.
यावेळी जिल्हा चिटणीस तथा सावंतवाडी विधानसभा संयोजक श्री. महेश सारंग, सावंतवाडी विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. राजन तेली, निवडणूक निरीक्षक श्री. दत्ता नाईक रेडकर, तालुका प्रभारी श्री. मंदार कल्याणकर, श्री. एकनाथ नाडकर्णी, राजन म्हापसेकर रमेश दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
येणा-या विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पक्ष संघटनात्मक बूथ निहाय आढावा घेण्यात आला. बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख, पंचायत समिती प्रमुख कार्यरत आहेत कि नाही यांची खातरजमा गोवा पक्ष निरीक्षक श्री. दत्ता नाईक रेडकर यांनी केली. श्री. महेश सारंग यांनी
,श्री. राजन तेली, श्री.राजन म्हापसेकर,श्री. एकनाथ नाडकर्णी मंदार कल्याणकर यांनी मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन श्री. नाना देसाई यांनी केलं तर आभार तालुकाध्यक्ष सुधीर यांनी मानले. त्यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, शहराध्यक्ष राजेश फुलारी, महिला अध्यक्ष सौ. दिक्षा महालकर, सुजाता मणेरीकर, हसीना शेख, संजय विरनोडकर, बाळा नाईक, चंद्रकांत मळीक, प्रीतम पोकळे, सूर्यकांत धर्णे, संजय गवस, बाळू गावडे, रवी नाईक, सुरेंद्र सावंत, शंकर देसाई, खुशाली शेटकर, दिवाकर सावंत, जयप्रकाश भावे, पराशर सावंत, आकांक्षा शेटकर,अभिमन्यू कुबल,भारतीय जनता पार्टी चे सर्व पदाधिकारी, बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख, पंचायत समिती प्रभारी,आदी सर्व उपस्थित होते.
