केसरकरांविषयी गावागावात रोष, त्यामुळे जनता आता बदल करणार…

अर्चना घारे: भावनिक राजकारण करून आजपर्यंत केसरकरांनी निवडणुका जिंकल्या…*_

⚡सावंतवाडी ता.०५-: “जाणीव जागर यात्रेच्या” माध्यमातून अनेकांचा असलेल्या या आमदाराबाबत रोष हे आम्हाला दिसून आलं आहे. त्यामुळे प्रत्येक लोक आता या आमदाराच्या विरोधात पेटून उठला असून येणाऱ्या निवडणुकीत ते नक्कीच बदल करतील, असा विश्वास अर्चना घारे यांनी आज इथं व्यक्त केला.

दरम्यान आजपर्यंत केसरकरांनी भावनिक राजकारण करून इथल्या लोकांना विकासाच्या नावाखाली उल्लू करून आपला विकास केला त्यामुळे आता या भावनिक राजकारणाला जनता येणाऱ्या निवडणुकीत पराभव केल्याशिवाय गप्पा बसणार नाही, असा विश्वास ही सौ घारे यांनी यावेळी व्यक्त केला.

You cannot copy content of this page