सावंतवाडीत उद्या रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरीय “खेळ फुगडीचा” स्पर्धेचे आयोजन…!

⚡सावंतवाडी ता.०५-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व शिवसेना विधानसभा प्रमुख श्री.रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून उद्या दिनांक ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी ठीक स.१०.३० वाजता जिल्हास्तरीय “खेळ फुगडीचा’ स्पर्धा चे आयोजन नगरपालिकेच्या नाथ पै सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. यात निमंत्रित फुगडी संघना विविध पारितोषिके व रोख स्वरूपात बक्षीस ठेवण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम १११११/- रु. , द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ७७७७/- रु. , तृतीय पारितोषिक रोख रक्कम ५५५५/- रु. तसेच इतर वैयक्तिक पारितोषिकेही सुद्धा ठेवण्यात आलेली आहेत. यामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने सावंतवाडी तालुक्यातील ज्येष्ठ महिला शिवसैनिकांचा सत्कारही करण्यात येणार आहे. तरी शिवसेना सावंतवाडी तालुक्याच्या सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व सावंतवाडी तालुक्यातील सर्व महिला भगिनींनी व रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन उबाठा पक्षाचे सावंतवाडी तालुका संघटक मायकल डिसोजा यांनी केले आहे.

You cannot copy content of this page