कणकवली : एस टी महामंडळाचा भोंगळ आणि मनमानी कारभारामुळे एसटी महामंडळाची चाललेली असलेली दुरावस्था यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर आणि विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सतीश सावंत आणि महाराष्ट्र राज्य एसटी कामगार सेना सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वात कणकवली एसटी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
कणकवली येथील विभागीय नियंत्रक अभिजीत पाटील यांच्या मनमानी आणि भोगलं कारभार , अनियमित एसटी फेऱ्या,शयनयान गाड्या, इतर विभाकडे वर्ग करणे,भोगस बांधकाम, नादुरुस्त गाड्या, वाढते अपघात, प्रवाशांची होणारी गैरसोय याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी विभाग नियंत्रण कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धडक देऊन संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्यात आला.
यावेळी विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्या कारणाम्याचे पत्ते उघड करण्यात आले. आणि प्रमुख मागण्यांपैकी आंदोलना दरम्यान सर्व मागण्या मान्य करून मंजूर करून घेऊन आंदोलन यशस्वीपणे पार पडले.
यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतिश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर जिल्हाप्रमुख-सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार सेना अनुप नाईक, रुपेश राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, हरकुळ बुद्रूक सरपंच आनंद ठाकूर, आबा मुंज, संजय सावंत, तात्या निकम, अजय सावंत, संजय रावले, महेश डीचोलकर, विकास राऊळ, सिद्धार्थ तांबे, आदि उपस्थित होते.
