शेतकर्यांना त्याच हक्क मिळवण्यासाठी शासनाचा भाग असलो तरी कायम पाठीशी उभा राहणार…

राजन तेली: मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडू, संजू परब, अर्चना घारे यांनी दिला आंदोलनाला पाठिंबा..

⚡सावंतवाडी ता.०४-: शासनाने काजू अनुदान तात्काळ देण्यासाठी जीएसटी सह अन्य सोडविण्यासाठी प्रयत्न करावा.शेतकर्यांना त्याचा हक्क मिळवण्यासाठी शासनाचा भाग असलो तरी कायम पाठीशी उभा राहणार आहे अशी ग्वाही माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे दिली.येथील शासनाने मंजूर केलेले काजू अनुदानावरील अटी शिथिल करुन ते तातडीने वितरित करावे तसेच जीएसटीची अट रद्द करावी आदी मागणीसाठी शेतकरी व बागायतदारांनी शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले. मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग दर्शवत शेतकऱ्याप्रती असलेला आपला रोष व्यक्त केला.

दरम्यान शासनाकडून मुख्य सचिव यांनी अनुदान वाटपावरील संमती पत्राची अट रद्द करत हमीपत्र वर अनुदान वाटप करण्याचे पत्र जारी केले मात्र जीएसटीची अट तसेच असल्याने शेतकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली येथे बुधवार पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे तसेच जीएसटी ची अट रद्द झाले पाहिजे अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन छेडू असा इशारा शेतकऱ्यांनी देत हे उपोषण तूर्तास मागे घेतले.

दरम्यान या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना घारे, भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब येणे उपचनस्थळी भेट देत पाठिंबा दर्शवला.तर सावंतवाडी-दोडामार्ग फळबायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, सुरेश गावडे यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.

शासनाने काजू अनुदानापोटी 279 कोटी रुपये काजु उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी शर्ती रद्द करून विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे, काजू बीला प्रतिकीलो 200 रूपये हमीभाव मिळावा, विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, वन्य प्राणी नुकसान करत आहेत ती भरपाई आणि वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळावे, काजू आयात शुल्क 20 टक्के करावे अशा विविध विषयांवर आंदोलन छेडले जात आहे.

You cannot copy content of this page