थोर व्यक्तिमत्वे निर्माण होण्यासाठी काळ यावा लागतो…

अजयराज वराडकर यांचे प्रतिपादन..

मालवण दि प्रतिनिधी

थोर व्यक्तीमत्वे निर्माण होण्यासाठी काळ यावा लागतो आणि अशी थोर व्यक्तीमत्वे आपल्या भारत भूमीत जन्मली व त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज आपली प्रगती झाली अशी व्यक्तिमत्त्व समाजाला पर्यायाने आपल्याला प्रभावित करत असतात त्यातून आपण सर्वांनीच बोध घेतला पाहिजे व त्यांचे स्मरण वेळोवेळी करणे आवश्यक असून अशा थोर लोकांच्या विचारावर आपण जगलं पाहिजे असे उद्गार, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी कट्टा येथे बोलताना केले

कट्टा येथील वराडकर हायकूल येथे
राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती तसेच कर्मयोगी, योगात्मा स्वर्गीय डॉ. काकासाहेब वराडकर यांची ४८ वी पुण्यतिथी पार पडली यावेळी क पं.शि. प्र.मंडळाचे सचिव सुनील नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुधीर वराडकर, संचालक श्री महेश वाईरकर, संचालिका स्वाती वराडकर, मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे, प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी, वराडकर इंग्लिश मिडीयमच्या जेष्ठ शिक्षिका सौ. शिरोडकर, संसद उपाधिपती के.एम. हडलगेकर, सहायक उपाधिपती भूषण गावडे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांनी केले .

श्री वराडकर पुढे म्हणाले शहरीकरणाच्यां प्रलोभनाला बळी पडून आजचा युवा वर्ग हा ग्रामीण भागातून सुटत चालला आहे व त्यामुळे ग्रामीण भागाचे सामाजिक संतुलन बिघडत असून छोटी छोटी गावे सुद्धा ओस पडताना दिसत आहेत. कोकणातील समृद्ध निसर्ग आणि गांवे बकाल न होता ती संपन्न बनू शकतात यासाठी निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर यांच्या संकल्पनेतील “गावी रहा मोठे व्हावा” हा उपक्रम राबविला जात आहे यासाठी आपल्या संस्थेने शाळेत गेल्या शैक्षणिक वर्षांपासून कौशल्याभिमुख शिक्षणाची सुरुवात केली असून यातून मूल्यात्मक गुणी विद्यार्थी निर्माण करण्याची जबाबदारी आम्हां सर्वांची असून यात पालकांची जबाबदारी सुद्धा वाढली आहे. मोबाईल फोनचा अतिवापर टाळण्यासाठी सर्व पालकांनी दक्ष राहून शाळांना सहकार्य करावे. यासाठी पालकांचे योगदान शिक्षकांइतकेच महत्वाचे असून स्ट्रीट आणि फास्ट फूडचा वापर न करता त्यांना दैनंदिन घरगुती आहाराचा लाभ घेण्यासाठी पालकांनी प्रबोधन करावं. शाळेमध्ये होणारे कला, क्रीडा, भाषा, गणित, विज्ञान आणि शिष्यवृत्ती परीक्षा अश्या विविध उपक्रमातून निरोगी आणि सशक्त विद्यार्थी घडवण्यासाठी सकस आहार ही महत्त्वाचा आहे याची आठवणही करून दिली..

या कार्यक्रमाचे औचित्य साधून इंग्रजी विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धा यात स्वामी शिवानंद इंग्रजी निबंध आणि योगात्मा स्व.डॉ. काकासाहेब वराडकर टॅलेंट सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच प्रशालेतील विज्ञान गणित शिक्षक पी. व्हीं. कानूरकर यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने योगात्मा स्व. डॉ. काकासाहेब वराडकर यांना श्रद्धांजली म्हणून प्रशालेचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी स्वरचित कविता सादर केली. या वेळी डॉ.दादासाहेब कला व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.संचीता करावडे, कु.प्राची परब, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची कु.भाग्यश्री सावंत, कु. कृतिका लोहार, कु. मयूर पेंडुरकर, कु. दर्श वराडकर यांनी भाषणे सादर केली. कु.स्वरा पेंडुरकर हिने सुमधुर आवाजात म. गांधी यांचे भजन गायिले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळा परिसरातील स्वच्छ्ता करण्यात आली. तसेच हरित सेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती पालव यांनी तर आभार प्रदर्शन सौ.फोपळे यांनी केले.

You cannot copy content of this page