शहरातील घटना: जखमी वायरमेनला उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल.
⚡सावंतवाडी ता.०४-:
सावंतवाडी शहरातील धोकादायक झाड तोडण्यात येत असताना आज काही झाडांवर विद्युत वाहीनी आल्याने ते बाजूला करण्यासाठी पोलवर चढलेला वायरमन खाली कोसळून गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या येथील विश्रामगृह परिसरात घडली.
घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत त्या जखमी वायरमेनला नागरिकांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर वारंवार धोकादायक पोल बदला अशी मागणी वारंवार करून देखील न बदलल्याने काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
