जयंत पाटील ,अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होणार भव्य सभा: अर्चना घारे करणार जोरदार शक्तीप्रदर्शन..
⚡सावंतवाडी ता.०४-: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माध्यमातून सावंतवाडीत उद्या शिवस्वराज्य यात्रेचा आयोजन करण्यात आले असून याची जय्यत तयारी गांधी चौकात सुरू असून त्यानिमित्ताने उद्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडीत भव्य सभा पार पडणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या माध्यमातून राज्यभर शिवस्वराज्य यात्रेचा आयोजन करण्यात आलं आहे.
त्याच निमित्ताने ही याञा उद्या दिनांक ५ रोजी सावंतवाडीत आयोजित करण्यात आले असून यावी,भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी राज्यभर जोरदार तयारी करत आहे दरम्यान या यात्रेनिमित्त सावंतवाडी मतदारसंघातून इच्छुक असलेल्या सौ. अर्चना घारे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.त्या निमित्ताने ते उद्या या यात्रेच्या माध्यमातून सावंतवाडी मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे त्याची तयारी देखील त्यांनी जोरदार सुरू केली आहे. दरम्यान या सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते उद्या सावंतवाडीकरांना काय आवाहन करतात हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे.
