Headlines

अग्निवीर बनलेल्या आबा दिलीप पाटील यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेकडून अभिनंदन…

वैभववाडी प्रतिनिधी
भारतीय लष्करात जास्तीत जास्त तरुणांनी सामील व्हावे म्हणून केंद्र सरकारने अग्निपथ योजना (Agneepath Scheme)सुरू केली आहे. तरुणांना या योजनेंतर्गत लष्कारात ४ वर्षे सेवा देता येते. या योजनेंतर्गत भारतीय लष्कराच्या वतीने मे महिन्यात घेण्यात आलेल्या परिक्षेत वैभववाडी येथील कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आबा दिलीप पाटील हा उत्तीर्ण होऊन त्याची या योजनेंतर्गत अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य बी.एस.नादकर, एस.बी.शिंदे, पी.एम.पाटील, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख पी.जे.सावंत, प्रशालेचे एन सी सी विभाग प्रमुख एस.टी.तुळसणकर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page