बाबुराव धुरी: अमित सामंतांचे “ते ” वक्तव्य चुकीचं, वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य…
⚡सावंतवाडी ता.०३-: निलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांचा पराभव करण्यासाठी सरड्यासारखे कितीही रंग बदलले तरी ते पराभव करू शकत नाहीत असा खोचक टोला शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज येथे लगावला.
दरम्यान कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये वैभव नाईक हे दोन टर्म आमदार राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांची ताकद ही या मतदारसंघात आहे. त्यामुळे कोणी किती पक्ष बदलून पराभव करण्याचा प्रयत्न केला, तरी ते यशस्वी होणार नाहीत , असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले अमित सामंत यांनी काल केलेल्या अर्चना घारेंच्या उमेदवारीचं वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. कुठल्याही वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीबाबत अद्याप कुठले प्रकारचे सुतवाच केलं नसल्याचा देखील धुरी म्हणाले दरम्यान एका मतदारसंघात राष्ट्रवादीला सीट देऊन उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ नेते जो काय घेतील तो आम्हाला मान्य असेल असेही श्री धुरी म्हणाले. राष्ट्रवादीची सावंतवाडी पाच रोजी शिव स्वराज्य यात्रा या मतदारसंघात येणार आहेत त्यासाठी आमच्या शुभेच्छा असून महाराजांचे विचार करून ते पुढे जात आहेत त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून नसून तो त्यांचा पक्षाचा कार्यक्रम आहे. परंतु आम्ही त्या नेत्यांचे स्वागत करू असे जिल्हाप्रमुख श्री.धुरी यांनी यावेळी स्पष्ट केले..
