बाबुराव धुरी: त्या बाऊन्सरच्या मागचा मेन सूत्रधारावर गुन्हा दाखल न झाल्यास शिवसेना सात रोजी जन आंदोलन उभारणार…
⚡सावंतवाडी ता.०३-: नेहमी दहशतवादाच्या विरोधात लढणारे दीपक केसरकर मात्र जिल्हा परिषद मध्ये घडलेल्या प्रकाराबाबत मात्र एकही शब्द बोलायला तयार नाहीत, कुठेतरी नारायण राणे यांची पाठराखण करून ते स्वतः त्या दहशतीच्या खाली दबले गेलेले आहेत, अशी खोचक टीका ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज येथे केली.दरम्यान स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी कोणाला किती जवळ घ्यायचं याचे एके उत्तर कालच्या घडलेल्या प्रकारानंतर केसरकर यांच्या भूमिकेतून दिसून आली आहे अशी टीकाही श्री धुरी यांनी यावेळी केली आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
श्री धुरी पुढे म्हणाले. गेले दहा वर्ष ज्यांनी दहशतवादाच्या विरोधात लढा दिला ज्यांना आम्ही आमदार करण्यासाठी दिवस रात्री मेहनत केली तेच व्यक्ती आज त्या दहशतवादाच्या विरोधात कुठेही बोलताना दिसत नसून कुठेतरी त्यांचेच पाठराखण करत असल्याचे दुर्दैवी गोष्ट यातून दिसून येत आहे याची आम्हाला अत्यंत वाईट वाटतं त्यामुळे येणाऱ्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहिला पाहिजे की अजून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत निर्माण झाली पाहिजे याचा विचार करण्याची वेळ आता सावंतवाडी मतदारसंघातील जनतेवर आली आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले.दरम्यान गेल्या पंधरा वर्षात दीपक केसरकर यांनी जनतेला विकासापासून वंचित ठेवले आहे त्यामुळे त्यांचे असलेले प्रलंबित प्रश्न देखील ते सोडू शकले नाहीत त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चित आम्ही आमचा आमदार निवडून आल्यावर आम्ही ते जनतेचे प्रश्न मार्गी लावू असा विश्वास आहे श्री.धुरी यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री धुरी पुढे म्हणाले जिल्हा परिषद मध्ये दोन दिवसापूर्वी बाउन्सर आणून जो काय प्रकार केला त्याच्या मागचा मेन सूत्रधारावर गुन्हा दाखल न झाल्यास उद्धव ठाकरे सेना ७ रोजी भव्य जिल्हा परिषद समोर जन आंदोलन उभारणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, चंद्रकांत कासार, मायकल डिसोजा, बाळा गावडे, शब्बीर मणियार आबा सावंत,अशोक परब, कौस्तुभ गावडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
