दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने ६ ऑक्टोबर रोजी निबंध स्पर्धा…

मालवण दि प्रतिनिधी
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा सिंधुदुर्ग व महिला जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जिल्हास्तरीय भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे करण्यात आले आहे.

ही स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक या दोन गटांमध्ये होणार आहे प्राथमिक गट इयत्ता ५ ते ८ असा असून या गटाला परिवर्तनाचा महामेरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा विषय देण्यात आलेला आहे. यासाठी शब्द मर्यादा ३०० ते ३५० राहणार आहे तर माध्यमिक गट इयत्ता ९ वी ते १२ वी असा ठेवण्यात आला या गटासाठी भारतीय संविधाना पुढील आव्हाने आणि उपाय हा विषय देण्यात आलेला आहे. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना प्राथमिक गटासाठी प्रथम क्रमांक १५०० द्वितीय क्रमांक १००० व तृतीय क्रमांक ७०० तसेच उत्तेजनार्थ एक ५०० रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. तर माध्यमिक गटासाठी प्रथम क्रमांक २०००/- रुपये द्वितीय क्रमांक १५००/- रुपये व तृतीय क्रमांक १०००/- रुपये व उत्तेजनार्थ ५००/- रुपये ठेवण्यात आलेली आहेत. बक्षीसाव्यतिरिक्त सन्मानचिन्ह पुस्तके व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या शाळेमार्फत अथवा आयोजकांना संपर्क साधून दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आपले नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी संजय पेंडूरकर 9422392790 येथे संपर्क साधावा असे आवाहन महिला जिल्हा शाखा अध्यक्ष सुषमा हरकुळकर व जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page