ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा ज्येष्ठ सेवा पुरस्कार लक्ष्मणराव आचरेकर यांना प्रदान…

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी आचरा रामेश्वर मंदिर येथे पुरस्काराचे वितरण..

मालवण दि प्रतिनिधी

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीचा मानाचा ज्येष्ठ सेवा पुरस्कार लक्ष्मणराव भिवा आचरेकर यांना जाहीर झाला होता हा पुरस्कार मंगळवारी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनी श्रीदेव रामेश्वर मंदिर आचरे येथे इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थांनाचे अध्यक्ष तथा धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई चे कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी, जेष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, खजिनदार कपिल गुरव, जे एम फर्नांडीस, चंद्रकांत घाडी, भिकाजीं कदम, प्रकाश पेडणेकर बाबाजी भिसळे व अन्य मान्यवर आदि उपस्थित होते.

You cannot copy content of this page