साने गुरुजी सेवामयी कर्मचारी पुरस्कार महेश कोळंबकर यांना जाहीर…!

मालवण दि प्रतिनिधी
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा २०२४ यावर्षीचा सेवामयी कर्मचारी’ पुरस्कार बँक ऑफ महाराष्ट्र , आचरे शाखेचे कॅशियर श्री.महेश विष्णू कोळंबकर यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण २० ऑक्टोबर २०२४ रोजी मालवण तालुकास्तर कथा महोत्सवाच्या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र रत्नागिरी झोनचे झोनल मॅनेजर सागर घनश्याम नाईक यांच्या हस्ते आणि साने गुरुजी कथामाला मालवणचे अध्यक्ष श्री. सुरेश शामराव ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

याप्रसंगी श्री.सदानंद कांबळी, श्री. प्रकाश पेडणेकर तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा आचरे शाखाधिकारी श्री. सिलंबू अरुमुगम , प्राध्यापक नागेश रघुनाथ कदम आणि कथामालेचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, साने गुरुजी ग्रंथभेट असे असून पूज्य साने गुरुजी शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्षातील हा पुरस्कार फार मोलाचा मानला जातो. या पुरस्काराचे वितरण प्रकाशभाई मोहाडीकर कथानगरी आचरे येथे होणार आहे, अशी माहिती श्री. पांडुरंग गुरुदास कोचरेकर यांनी दिली.

You cannot copy content of this page