मालवणातील महिला जळीत प्रकरणातील संशयित आरोपी पोलीसांच्या ताब्यात सापडला…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण एसटी स्टॅन्ड समोरील लॅब मध्ये काम करणाऱ्या सौ. सौभाग्यश्वरी गोवेकर पूर्वाश्रमीची प्रीती केळूसकर हिच्यावर पेट्रोल ओतून जाळल्यानंतर उपचारादरम्यान या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असताना या प्रकरणातील फरार असलेला संशयित आरोपी त्या महिलेचा पहिला पती सुशांत सहदेव गोवेकर (वय ४०) (रा. धुरीवाडा मालवण) याला पकडण्यात पोलीसांना यश आले आहे. कुंभारमाठ येथून सुशांत गोवेकर याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page