मालवण तालुका खो-खो स्पर्धेत चौके हायस्कूलची बाजी…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण वायरी येथील रेकोबा हायस्कूल येथे संपन्न झालेल्या मालवण तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत मालवण तालुक्यातून विविध शाळांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत येथील भ. ता. चव्हाण विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चार पैकी तीन गटांमध्ये विजय संपादन करून जिल्हास्तरावर प्रवेश मिळविला. तर एका गटामध्ये उपविजेतेपद संपादन केले.

या स्पर्धेत चौके हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी १४ वर्षे मुले प्रथम, १४ वर्षे मुली प्रथम, १७ वर्षे मुले प्रथम क्रमांक व १७ वर्षे मुली उपविजेतेपद संपादन केले. प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या तिन्ही गटांची जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या स्पर्धेसाठी चौके हायस्कूलचे क्रीडा शिक्षक अनिल आचरेकर यांनी विशेष मेहनत घेतली. यशस्वी विद्याथ्यचि चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईच्या पदाधिकारी तसेच स्थानिक कमिटीचे अध्यक्ष बिजेंद्र गावडे, मुख्याध्यापिका रसिका गोसावी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page