मालवणात महिलेवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न…!

मालवण (प्रतिनिधी)

मालवण शहारात बसस्थानक समोर एका लॅब मध्ये कामाला असलेल्या एका महिलेला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न एका अज्ञात व्यक्तीकडून करण्यात आला. हि घटना आज दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत आग विझवून गंभीर भाजलेल्या या महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी मालवण ग्रामीण रुग्णालय परिसरात गर्दी झाली होती.

You cannot copy content of this page