ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यरत करा…

मनसेची मागणी:लवकरच कार्यवाही करण्यात येईल,गटविकास अधिकाऱ्यांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन..

⚡सावंतवाडी ता.२५-: तालुक्यामध्ये ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यरत करण्यात यावी अशी मागणी आज मनसेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्याकडे केली लवकरच संदर्भात कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन यावेळी गटविकास अधिकारी श्री नाईक यांनी दिले.

तर ग्रामपंचायत मध्ये नागरिकांची सनद लावणे वंदन करत करा त्याचप्रमाणे इमारत बांधकाम कामगार यांना व त्यांनीकरण करण्यासंदर्भात सही देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिले असताना ग्रामसेवक टाळाटाळ करत आहेत त्यांना सूचना द्या तसेच मळगाव येथे बंद असलेली स्ट्रीट लाईट आधी प्रश्नावर त्यांनी गटविकास अधिकारी श्री नाईक यांचे लक्ष वेधले.

यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, शहराध्यक्ष राजू कासकर, गुरु गवंडे ,सुधीर राऊळ ,राकेश परब, आधी उपस्थित होते

You cannot copy content of this page