ग्लोबल रक्तदातेतर्फे मालवणात १ रोजी रक्तदान शिबीर व आदर्श रक्तदाता पुरस्कार सोहळा…

मालवण (प्रतिनिधी)

राष्ट्रीय स्‍वैच्छिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून ग्लोबल रक्तदाते मालवण यांच्या वतीने रक्तदान शिबीर व आदर्श रक्तदाता पुरस्कार सोहळा मंगळवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत मामा वरेरकर सभागृह मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी देहादान आणि नेत्रदान संकल्प मोहीम याविषयी मार्गदर्शन व नाव नोंदणी ही करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे सिंधुदुर्ग मुख्य समन्वयक डॉ. विदयाधर तायशेट्ये यांचे सहकार्य लाभले आहे.
तसेच यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभाग येथे ३५ वर्षे सेवा बजावलेले आणि देहदान अवयव दान कार्यक्रमात गेली सात वर्षे कार्यरत असलेले डॉ.प्रमोद विनायक लिमये यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. इच्छुकांनी अर्ज नोंदणी साठी आपले आधारकार्ड घेऊन यावे तसेच रक्तदात्यांनी रक्तदानच्या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग, ग्लोबल रक्तविरांगना मालवण, ग्लोबल रक्तदाते गोवा, ग्लोबल मालवणी सामाजिक संस्था, ग्लोबल रक्तदाते कोकण महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page