वाढदिवसानिमित्त शैलेश लाड यांच्याकडून नट वाचनालयासाठी दहा हजारची देण्गी…

⚡बांदा ता.२०-: राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी विधानसभा युवक अध्यक्ष तथा येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील नट वाचनालयाला स्पर्धात्मक शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी दहा हजार रुपयांची देणगी दिली.

यावेळी वाचनालयाच्या सभागृहात श्री लाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, विमा प्रतिनिधी संदीप नार्वेकर, प्रशांत गवस, सत्यवान काळसेकर, ओंकार राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी श्री लाड यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. श्री लाड यांना वाचनालयाचे आजीव सभासद करून घेण्यात आले. यावेळी त्यांनी शैक्षणिक स्पर्धात्मक उपक्रमांसाठी दहा हजार रुपयांची देणगी दिली. या देणगीतून मुलांसाठी शालेय स्तरावर चित्रकला व रंगभरण स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे सचिव राकेश केसरकर यांनी सांगितले. आभार निलेश मोरजकर यांनी मानले.

You cannot copy content of this page