संजू परब:माझ्या नादी लागाल तर सर्व कुंडली बाहेर काढु ..
⚡सावंतवाडी ता.२०-: परशुराम उपरकर यांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा आपले राजकीय अस्तित्व काय आहे ते पाहावे. तुमची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. तुम्हाला आज कोणत्याही पक्ष घ्यायला तयार नाही, त्यामुळे उपरकरांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंमत ही झिरो आहे हे सर्वत्र ज्ञात आहे. असा पलटवार माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केला.
दरम्यान दुसऱ्यांना लँड माफिया म्हणणाऱ्या उपरकर यांनी माझ्या नादी लागू नये अन्यथा तुमचे सर्व कुंडल्या बाहेर काढू असा इशाराही श्री परब यांनी यावेळी दिला. तुमचे सर्व कारनामे आमच्याकडे आहेत. वेळ आल्यावर सर्व उघड करू असा गरभीत इशाराही परब यांनी दिला आहे.
