सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी घेतले पंकज अदम यांच्या गणरायाचे दर्शन…!

⚡देवगड ता.२०-: सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी नुकतीच जामसंडे भटवाडी येथील पंकज अदम यांच्याघरी भेट देवून त्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी अदम कुटुंबियांकडून त्यांना महालक्ष्मीची प्रतिकृती भेटवस्तू म्हणून देण्यात आली.
सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले हे देवगड दौ-यावरती आले असता त्यांनी देवगड येथील किल्याची पाहणी करुन गणपती मंदिराचे दर्शन घेतले. तसेच कुणकेश्वर मंदिरामध्ये जावून दर्शन घेवून मंदिराची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत पंकज अदम, उत्तम बिर्जे,विकी अदम आदी उपस्थित होते.
फोटो कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेताना युवराज लखमराजे भोसले पंकज कदम आदी छाया वैभव केळकर
फोटो- युवराज लखमराजे भोसले यांना महालक्ष्मीची प्रतिकृती भेटवस्तू देताना पंकज अदम.

You cannot copy content of this page