बांद्याच्या दिशेने गेल्याची दुचाकी मालकाची माहिती..
⚡बांदा ता.१९-: धारगळ-ओशालबाग येथून घराच्या अंगणात उभी केलेली दुचाकी (जीए 03 एम 0782) चोरीस गेल्याची घटना सोमावारी 16 सप्टेंबर रोजी घडली आहे. याची तक्रार दुचाकी मालक तुषार वामन कोनाडकर यांनी पेडणे पोलिस स्थानकात दिली आहे. सदर दुचाकी धारगळ पेडणे मार्गे बांद्याच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे तुषार कोनाडकर यांनी सांगीतले.
सदर दुचाकी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी तत्काळ पेडणे पोलीस किंवा आपणास संपर्क साधावा असे आवाहन तुषार कोनाडकर यांनी केले आहे.
फोटो ——
धारगळ : चोरीस गेलेली दुचाकी.
